पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सांगताना अवेळीच सांगू कसे? पोळलेल्या मनाचे असे हे हसे!
काल गर्दी किती; रांग होती इथे आटतांना कुणी सोबतीला नसे
हात घेताच हातात का वाटले? तप्त अग्नीत जळलेय मोती जसे
शिक्षणाने मिळालाय विश्वास की; चंद्र तारे अता दूर ना फ़ारसे
पिंजरा तोडुनी मी सिमा लांघल्या गाव ब्रम्हांड माझे "अभय" छानसे
- गंगाधर मुटे ---------------------------------------------
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.