माती
***********************************
रोशनकुमार शामजी पिलेवान
***********************************
कर्ज काढून शेती केली
तुम्ही वाढवलेत बियाण्यांचे भाव
ढगांनीही दाखवली आस
निराशाच पदरी
गळा मात्र गळफास
तुम्ही लोडशेडींग वाढवली
कित्येकदा बंद केलेत जिवंत तारांचे श्र्वास
पिकांचं केलं ऑक्सिजन लेव्हल कमी
कमाल केलीत राव
घातला वर्मी घाव
आम्हाला ओळखताच आला नाही तुमचा कुटील डाव
नुसतीच दिलीत पोकळ आश्वासनं
तोंडाला पुसलीत पानं
दिलेच नाहीत मालाला हमी भाव
तुम्ही वडापाव विकायला लावलं
आणि सिलेंडर महाग केले
डीझेल पेट्रोल दर वाढ केली
आमची कोंडी केली
कायम हिणवत राहिलात झुरळ म्हणून
तेल कमी खा
सोनं घेऊ नका
मुषाफरी करू नका म्हणून
करत राहिलात कायम सासुरवास
तुमची चालली ऐश
आमच्या नशीबी मात्र वनवास
साहेब, आम्ही मातीच सोनं केलं
तुम्ही आमच्या सोन्यासारख्या
आयुष्याची माती केली
***********************************
रोशनकुमार शामजी पिलेवान
गोडोली नाका सातारा
मो.7798509816
***********************************
