Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

थांबा!

Main page content

Raosaheb Jadhav
By Raosaheb Jadhav | 11:17 PM IST, सोम September 11, 2017
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
छंदमुक्त कविता

*थांबा!*

थांबा!
उत्खनन चालू आहे.

फाडत होता तो छाती मातीची,
कालपरवापर्यंत नांगराच्या फाळाने
नांगरत नशीब स्वतःचे...

आणि घालतही होता टाके
हाती घेऊन कुदळ फावडे
पोहचवण्यासाठी कुणब्याचे कसब
पुढल्या पिढीपर्यंत,
थाटात शल्यविशारदाच्या...

सोबतच उरकली होती पेरणीही त्याने
करत हवाली
काळजाच्या ठोक्यांना
कोंबाळत्या 'बी'च्या...

पण मरून गेलाय तो आज अचानक...
आत्महत्त्या केलीय त्याने...म्हणे...

पण थांबा!
हत्त्या की आत्महत्त्या?
उत्खनन चालू आहे...

तोपर्यंत करू आयोजित
एखाद्या चौकात एखादा 'कँडलमार्च'
जमलंच तर 'मोर्चा'
नाहीतर देऊन टाकू एखादे 'पॅकेज'
अंत्यविधीच्या वाटेवर मूडद्याच्या पदराला
बांधलेल्या वाफाळत्या भातासारखे
जे फेकता येईल सोडून
अर्ध्या रस्त्यातच...

पण थांबा!
हत्त्या, आत्महत्त्या की नैसर्गिक मृत्यू?
उत्खनन चालू आहे...

तोपर्यंत जमलेच तर
मांडून पाहू राजकीय गणिते.
नाहीतर भांडत राहू
घालत वाद वैचारिक चर्चांचे
नाहीतर करू कौतुक जरा त्याचे
पोशिंदा बिशिंदा अशी काहीतरी
जोडत विशेषणे.
नाहीतर त्यानेच पिकवल्या कापसाच्या
बोळ्यांतून दरवळत्या सुगंधाचे
किंवा जरा गुंगी आणू त्याला
त्याच्याच मळ्याच्या उसाच्या
मळीतून मिळालेल्या मद्याच्या
रिचवत चार बाटल्या...

पण थांबा!
इतिहास, वर्तमान की भविष्य?
संशोधन चालू आहे...

आणि चालू आहे पेरणीही
झिरपत्या वांझ लेखण्यांतून सोबतच
जागतिकीकरणाचे दावत आमिष
त्याच्या कर्जबाजारी शिवाराला...

पण थांबा!
तट्टम पोट, आंधळे मठ की व्यवस्थेचे तट?
जबाबदारी व्हायचीय निश्चित अजून
उत्खननात मिळालेल्या निष्कर्षांवरून...

पण थांबा!
आता मी टाकणार आहे निब्बर कानाखाली
कानावर हात ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या
कारण आता जरा
धरलाय वाफसा,
माझ्याही घामाच्या धारांतून
भिजल्या मातीने
नुकताच...

रावसाहेब जाधव (चांदवड)
9422321596

थांबा!

Raosaheb Jadhav

सोमवार, September 11, 2017 - 23:19
Permalink
New

धन्यवाद!!!

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, September 12, 2017 - 19:02
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
खूप छान कविता सर.

Rajesh Jaunjal

मंगळवार, September 19, 2017 - 14:55
Permalink
New

खूप छान कविता सर.

  • Log in or register to post comments
थांबा!

Raosaheb Jadhav

बुधवार, September 27, 2017 - 23:07
Permalink
New

धन्यवाद सर!

  • Log in or register to post comments

In reply to खूप छान कविता सर. by Rajesh Jaunjal

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8232 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • डॉ. मीरा पंडित

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 22 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    13 hours 50 minutes ago
  • 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
    13 hours 51 minutes ago
  • अंतर्मुख करायला लावणारी
    13 hours 54 minutes ago
  • अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
    13 hours 56 minutes ago
  • सुरेख आयोजन... पत्रिका
    14 hours 28 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini