

अवकाळी
चर चर करत धावे
रीकाम्याच बैलगाड्या,
अर तुझ्या गैरहजेरीत बी
जगवल्या व्हत्या काही काड्या.(1)
त्याच्यावरच्या आशेचाबी
जीव घेतलास तु,
अवकाळी पडुन पावसा
खोल आत घाव घासलास तु.(2)
बळ आनुन उसन
टाकत होतो पाऊल,
तेवढ्यात जणु लागली यमाला
माझ्या मरणाची चाहुल.(3)
ना पडलास तु वेळेवर
बसला दुष्काळ पीक गीळून,
का येतोयस आता
टाकण्या देहाला पीळुन.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:
शेतकरी तितुका एक एक!
Pages