नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!
जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!
छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!
हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
वाह... सुंदर
वाह... सुंदर
धन्यवाद
धन्यवाद निलेश सर
शेतकरी तितुका एक एक!
आत्मक्लेश अभियान
काल शेतकर्यांच्या नवयुवक पुत्रांनी "आत्मक्लेश अभियान" करून शासन व्यवस्थेविरुद्ध तुतारी फ़ुंकली. ३५ वर्षापूर्वी शरद जोशींनी लावलेल्या रोपट्याला आता फ़ळे धरायला लागली, असा संकेत मिळत आहे.
तुतारी फ़ुंकण्यासाठी तयारी करणार्या Abhijeet Arunrao Falke , shivkumarji chandak, Gajanan Borokar आणि Vilas Tathod यांना ही कविता अर्पण करत आहे.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
(विषय दिलेला नाही)
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप