सर्वत्र आज आहे हा एक फक्त रोना.
सर्दी बुखार साधा झाला तरी करोना.
जर का उद्या मराचे तर आज हे मरोना.
मुर्दाड या जनांना घेऊन जा करोना.
मालास शेतकीच्या आधीच मोल नाही,
पडतील दर पुन्हा या मंदीमुळे करोना.
झाला न लाभ काही डाऊन-लॉकनेही
आली उलट गरीबी दारामधे करोना.
शेतीतही पसरले साम्राज्य अवदशेचे,
बीमार शेत झाले काळात या करोना.
'रविपाल' रोपटे तू लावू नको भयाचे,
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना!
• गझलकार •
डॉ. रविपाल भारशंकर
हिंगणघाट, जि. वर्धा.
Comments
शेती आणि करोना खुपच छान मेळ
शेती आणि करोना खुपच छान मेळ साधला सर.
गझलेचा प्रत्येक शेर विषयावर आधारित..
धन्यवाद!
धन्यवाद राजेश! *Ramram* :R:
Dr. Ravipal Bharshankar
शेती आणि कोरोनाचा खुपच सुंदर संदर्भ
मस्त रचना डाॅ साहेब रोपटे लावू नको भयाचे, उगवेल शेतीतही कोरोना. मक्त्याचा शेर अति सुंदर. जबरदस्त!
धन्यवाद
धन्यवाद प्रदिप भाऊ *Ramram* *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना!.
वाह!! सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद!
आभार आपले दळवीजी *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
खरयं, भयाचे रोपटे लावू नका.
खरयं, भयाचे रोपटे लावू नका. डाँक्टरसाहेब..
Narendra Gandhare
धन्यवाद!
खूप खूप आभार भाऊ. *Ramram* *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
स्वागत
स्वागत भाऊ *bq*
Narendra Gandhare
खूप सुंदर गझल
मुक्तविहारी
धन्यवाद!
आभार आपले मुक्तविहारी *Ramram* *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
खूप सुंदर गझल
खूप सुंदर गझल आहे करोना आणि शेतकरी या विषयावर लिहिलेली!
मुक्तविहारी
धन्यवाद !
आभार आपले मुक्तविहारीजी *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
कोरोना...आणि भय
कोरोना...आणि भय
धन्यवाद!
आभार आपले जावळेजी *Ramram* *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
कोरोना...आणि भय
कोरोना...आणि भय
धन्यवाद!
आभार आपले जावळेजी *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे स्वागत
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !
आभार आपले सर *Ramram*
Dr. Ravipal Bharshankar
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings