Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

शेतकरी साहित्य संमेलन : एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:56 PM IST, Sun July 27, 2025
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन

(शेती अर्थ प्रबोधिनीचा उपक्रम)
एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा
 
अ.  भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या १२ वर्षाच्या यशस्वी सफलते नंतर १३ व्या वर्षात पदार्पण करताना काही नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करावी, असा एक विचार आहे.  
सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे उपक्रम असू शकतात :
 
  1. अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करणे.
  2. फिरते प्रवासी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करणे. (राज्यातील आणि देशातील विविध भागात शेतीचा पाहणी आणि अभ्यास दौरा करत प्रवासादरम्यान संमेलन)
  3. मानवी जीवन अभ्यास दौरा आयोजित करणे. (उदाहरणार्थ दूरवर आणि खोलवर आदिवासी भागात जाऊन आदिवासी जीवनाचा आणि तेथील आदिवासी शेतीचा अभ्यास करणे) 
  4. ऑनलाइन शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करणे. (११ एप्रिल म. ज्योतिबा फुले यांचे जयंतीदिनी)
  5. विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करणे. (३ सप्टेंबर युगात्मा शरद जोशी यांचे जयंतीदिनी)
  6. मराठी भाषा गौरव दिन आयोजित करणे. (२७ फेब्रुवारी)
वरील सहाही उपक्रमांना अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा दर्जा देऊन त्यानुरूप आखणी करणे शक्य होईल का ? यासंदर्भात आपली मते कळवा, जेणेकरून उपक्रमांचा कच्चा आराखडा तयार करणे, आखणी करणे सोयीचे होईल!

आपला स्नेहांकित,

 
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष, अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ


13sss
साहित्य चळवळ
13sss
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6050 views

Comments (4)

अखिल भारतीय शेतकरी साहित्य

nilkavi74

Monday, July 28, 2025 - 10:36
Permalink
New

अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन वर्षात एकदा घेऊच...
त्याच बरोबर २ आणि ३ नंबराचा मुद्दा अतिशय उपयुक्त ठरेल सर साहित्यिक दर्जा वाढेल, अस्सल साहित्य साहित्यिकांना कळेल. आणि दिनविशेष महत्त्वाचे साहित्य आणि साहित्य संमेलन होतंच असतात परंतु शेतकरी साहित्य चळवळीतून या दिनविशेष अनुषंगाने होणारे साहित्य संमेलने आणि साहित्य काही काही औरच असेल, ते सकस असेल यात तिळमात्रही शंका नाही.

सर... आपणं करत असलेला साहित्यिक विचार अतिशय उत्तम... उपयुक्त.

आणि त्यासाठी प्रत्येकांनी ( शेतकरी साहित्याशी जुळून असणाऱ्यांनी ) वेळ देणे व आर्थिक मेळ साधणे तितकेच गरजेचे आहे.

  • Log in or register to post comments
शेती मातीवरील कविता अगोदर

तुळशीराम बोबडे

Monday, July 28, 2025 - 10:39
Permalink
New

शेती मातीवरील कविता अगोदर मागवाव्या आणि त्यातून नंतर कवी आणि कवितेची निवड करावी साहित्य संमेलन मधील कवी संमेलनात सादरीकरण करण्यासाठी. ( कविता पाठविण्यासाठी अगोदर साहित्य संमेलन नोंदणी करणे आवश्यक असेल )

माझं वैयक्तिक मत आहे. सर्वांना पटेल असं अजिबात नाही.

  • Log in or register to post comments
*ऑनलाईन साहित्य संमेलन*

गंगाधर मुटे

Friday, August 1, 2025 - 09:11
Permalink
New

*ऑनलाईन साहित्य संमेलन*

दिनांक 3 ते 9 सप्टेंबर 2025 ला ऑनलाइन अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय होत आहे.
रात्री दररोज एक तास याप्रमाणे सात दिवस संमेलन चालेल. सर्वांसाठी अर्थात रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा सर्वात सोयीची वेळ कोणती असते, त्याविषयी माहिती हवी आहे.

रात्री सात ते आठ
रात्री आठ ते नऊ
रात्री नऊ ते दहा

उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी फुरसतीची वेळ निवडायची आहे.

कृपया आपली मते द्यावीत.

  • Log in or register to post comments
*१३ वे अखिल भारतीय मराठी

गंगाधर मुटे

Thursday, August 14, 2025 - 18:51
Permalink
New

*१३ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन (ऑनलाईन)*

दिनांक 3 ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत रात्री नऊ ते दहा वाजता ऑनलाइन अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे.

रात्री दररोज एक तास याप्रमाणे सात दिवस संमेलन चालेल.

कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर केली जाईल परंतु वेळ कमी आहे त्यामुळे प्रतिनिधी नोंदणीसाठी फार कमी वेळ उपलब्ध असेल. कृपया सर्वांनी तयारीत असावे.

*सहकार्याच्या अपेक्षेत!*

  • Log in or register to post comments

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 0 users online.
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 17 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 17 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 18 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ