हमी भाव
कुणी, हमी भाव देता का रे? हमी भाव ?
एका शेतक-याला ,शेती करणा-याला कुणी भाव देता का?
एक शेतकरी ,शेती वाचून,
पिका वाचून,
साहेबाच्या माये वाचून,
देवाच्या दये वाचून,
रानावनात हिंडत आहे.
जिथुन कोणी भाव हिसकावुन घेणार नाही,
अशी मार्केट ढूंढत आहे,
कुणी, हमी भाव देता का रे? हमी भाव ?
काय रे बाळा, खरच सांगतो बाबांनो
कास्तकार आता थकून गेलाय,
घरातल्या समस्या , जबाबदारीत
अर्ध-अधिक तुटून गेलाय,
सारी भिस्त पिकावरती,
लहरी निसर्गासोबत ,
झेप झुंज घेऊन घेऊन,
कास्तकार आता थकलाय.
जळके तूटके पंख हालवित,
खुरडत खुरडत उडत आहे,
खर सांगतो बाबांनो,
कास्तकाराला सरकारचं नडतेय रे,
हे.. बाबा.. कुणी हमी भाव देता का रे? हमी भाव ?
कास्तकाराला महाल नको,
राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको,
थैली मधली भेट नको,
हवे हक्काचे दाम ..
बाराही महिने संसार चालवण्यासाठी,
नक्की हवा हमी भाव ,कष्टाचे चिज होण्यासाठी ..
कास्तकाराला जगण्यासाठी,
फक्त हवय शेतमालाला हमी भाव
लहान लहान लेकरं अन बायकोसाठी .
कुणी हमी भाव देता का रे? हमी भाव ?
श्याम ठक
बार्शीटाकळी जि . अकोला
९९७५७९२५२०






अतिथी सदस्य या आय डी ने
गंगाधर मुटे
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? सदस्यत्व कसे घ्यावे - https://baliraja.com/it-7
IT कार्यशाळा - लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे? - https://baliraja.com/it-15
संपादन/Edit कसे करावे? - https://baliraja.com/it-15
- गंगाधर मुटे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
गंगाधर मुटे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
गंगाधर मुटे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी. :R:
कवी श्याम ठक यांची हमी भाव..
Liladhardawande786
कवी श्याम ठक यांची हमी भाव.. उत्तम कविता