वृत्त - लवंगलता.
अक्षरे लिहिलेली कागद, अजूनही कोरीच आहेत,
हृदयात या साठवलेले, घाव अजून बरीच आहेत.
माझे मला शोधतो मी, आजही विचारांच्या गर्दीत,
एकटाच नव्हे, सोबत हरवलेले अजून बरीच आहेत.
अक्कल पाजळतो वासरांसी, होऊन मी लंगडी गाय,
काय करावा गर्व? इथे बुद्धिमान अजून बरीच आहेत.
जाता जाता जाईन सांगून, पुन्हा भेटणे शक्य नाही,
एवढेच नाही, भोग शिल्लक अजूनही बरीच आहेत.
वाटेल संपले सारे, डोळ्यांसमोर पसरेल अंधार,
हरणार नाही एवढ्यात, पर्याय अजून बरीच आहेत.
चुकेल वाट तुझी, भरकटशीलही, नको हळवा होऊ,
फक्त ते एकच नव्हते, इथे ध्येय अजून बरीच आहेत.
मुक्तीसाठी का करतो विनवणी तू त्या कावळ्याची?
कावळा सोडूनही जगात पक्षी अजून बरीच आहेत.
जरी न कळले कुणा, ऋणानुबंध आपुले खरे आहेत,
फक्त एकच नाते नव्हते, अजूनही नाती बरीच आहेत.
का कुणाच्या जाण्याने कोलमडून जातो संदीप कुणी?
जो गेला तो आपला नव्हता, इथे अजून बरीच आहेत.
Main page content
छंदोबद्ध कविता
सार्वजनिक
Search
User login
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 4 hours 3 minutes ago
- 4 hours 7 minutes ago
- 4 hours 30 minutes ago
- 6 hours 46 minutes ago
- 7 hours 37 minutes ago
