आणि त्यावर चर्चा घडवून आणत आहे.
१) "पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन!
लिंक
२) शेतीच्या शोषकांना पोषक लेखन करणारे शेतीसाहित्यिक असू शकत नाही... जरी त्यांच्या नावाने सातबारा असेल तरीही!
३) ज्याचा पक्ष, जात आणि धर्म शेती हाच असतो तोच फक्त शेतीसाहित्यिक असतो... बाकी सर्व शेतीच्या शोषकांना पोषकच!
४) धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका हातात नांगर व दुसऱ्या हातात लेखणी धरावी यासाठी म. शे. साहित्य संमेलनाचे प्रयोजन!

Comments (4)
५) कोणत्या स्वभावाच्या
गंगाधर मुटे
५) कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना आसपास फिरकू द्यायचे नाही हे शेतकरी साहित्य चळवळ आधी ठरवते. नंतर सहकारी जोडते.
#शुभरात्री_लोक्सहो
६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि
गंगाधर मुटे
६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि शास्त्र
शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यास पद्धतशीरपणे बगल देऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपायोजना, नाना तऱ्हेच्या शेतीपद्धती, ज्ञान-विज्ञान, पौराणिक-आधुनिक, सेंद्रिय-जैविक-रासायनिक, शाश्वत-अशाश्वत, किटनाशक-गोमूत्र, एमएसपी-एमआरपी, अशा एकापेक्षा एक सरस व आकर्षक भुलभुलैय्यात गुंतवून.... अगडबंब यंत्र-मंत्र-तंत्र वगैरे अंगीकारायला सांगण्याचे नवनवे खुळखुळे वापरायचे आणि शेतकऱ्यांना खेळवत व झुलवत ठेवून पद्धतशीरपणे वर्षानुवर्षे शेतमाल स्वस्तात लुटत राहायचे..... हे शेतीच्या लुटारुंचे शास्त्र आणि शस्त्र आहे... याची अर्थशास्त्रीय पायावर तर्कशुद्ध जाणीव साहित्यिकांना करून देण्यासाठी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #शेतीचे_अनर्थशास्त्र
७) तस्कर, अफसर, गुंडा, मवाली,
गंगाधर मुटे
७) तस्कर, अफसर, गुंडा, मवाली, चोर, डाकू, भक्त, चमचा, निळा, लाल, भगवा, हिरवा.. "शेतीशी इमान" असलेला कुणीही शेतकरी साहित्य चळवळीला चालतो.
https://www.facebook.com/share/p/4tckRSd8M8y2KVCD/?mibextid=oFDknk
८) संमेलनाला या म्हटलं की
गंगाधर मुटे
८) संमेलनाला या म्हटलं की ऐकवणाऱ्यांचीच रांग लागते. ऐकणारे तुरळकच. हे कशाचे लक्षण आहे?
#सांगा_ब्वॉ #शुभरात्री_लोक्सहो
https://www.facebook.com/share/p/SbjDjvBkt2tKvghY/?mibextid=oFDknk