पहिला पाऊस रानातला....
*******************
संपला उकाडा उन्हाळ्याचा,
सुटला थंडगार वारा ,
आतुरले सारे आता ,
कधी बरसतील जलधारा....
निवडून ठेवलं शेतशिवारं
बरस टपोरे थेंब घेऊन ,
भागव तृष्णा या मनाची
तृप्त होऊ दे अमृत पिऊन ...
आले आले थेंब मृगाचे
मृदगंध पण दरवळला
प्रेमाचा उमाळा मग त्या ,
ओल्या मातीलाही आला...
भिजू चिंब आनंदाने ,
पहिल्या या पावसात
करू स्वागत स्वागत ,
पहिली सर आली रानात ....
पाहता झिम्माडं हा पाऊस
तृप्त तनमन झाले ,
बळीराजाच्या लोचनी
स्वप्न हिरवे दिसू लागले..!!
********************
सौ.सुनिता कोंमावार, दिक्कतवार.
सरकारवाडा,
परळी वै.431515
जि. बीड
9405464314
ई-मेल kommawarsunita57 @gmail.com

पहिला पाऊस रानातला संदररचना
लक्ष्मण लाड
पहिला पाऊस रानातला
संदररचना
प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*