खट्याळ पाऊस
चिंब ओले तन
रिमझिमते मन
वेडावले
दाटले मेघ
बेधुंद पावसाच्या धारा
सुगंधी वारा
थरारले
तुझ्या स्पर्शाने
मंद मंद सुवास
तप्त श्वास
कडाडले
ऋतू स्वप्नांचे
वेध लागे मिलनाचे
बीज प्रेमाचे
अंकुरले
स्पर्श ओला
झिम्माड अंग रोमारोमात
ओल्या मिठीत
शहारले
_____________________
भरत माळी
न्याहली जि. नंदुरबार
मो. ९४२०१६८८०५

प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*