पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
कसे अंकुरावे अता ते बियाणे?
भुईला दिली ओल नाही ढगाने कसे अंकुरावे अता ते बियाणे?
दशा लोंबताना तिच्या लक्तरांच्या कुणी का हसावे? कुबेराप्रमाणे
दगाबाज झाले तुझे शब्द सारे अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?
निखारे विझूनी कशी राख झाली? अता चेतवू मी मशाली कशाने?
तिजोरी कुणाची उधळतो कुणी तो अमर्याद झाली तयांची दुकाने
नको रत्न मोती न पाचू हिरे ते ’अभय’ ते खरे जे मिळाले श्रमाने
गंगाधर मुटे ............................................... (वृत्त - भुजंगप्रयात ) ....................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.