पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
नागपुरी तडका
नाकानं कांदे सोलतोस किती? तुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती नाकानं कांदे सोलतोस किती? तुझी नशा किती, तू डोलतोस किती नाकानं डांगरं तोलतोस किती? तुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती नाकावर भेद्रं झेलतोस किती? तुझी मेहनत किती, तू राखतोस किती नाकानं टेंभरं चाखतोस किती? तुझे योगदान किती, तू लाटतोस किती नाकानं गाजरं वाटतोस किती? तुझी सत्ता किती, तू येलतोस किती नाकानं आलू छिलतोस किती? तुझी भूक किती, तू गिळतोस किती अभयानं जनता पिळतोस किती? गंगाधर मुटे ............................................ ढोबळमानाने शब्दार्थ-
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.