पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
त्यांचाच जीव घे तू .....!
हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता
मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता
मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना करतात भाषणे ते आणून आव सस्ता
लाठी उगारताना, बंदूक रोखताना का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
सत्याग्रहास आता रक्तात माखवावेह शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.