पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
खाया उठली महागाई
नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी गहाळ झाल्या सोयी-सुविधा, परी कर वाढतो भारी धान्यामधी खडे मिसळती, शासक टुकटुक पाही वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
तेलामध्ये भेसळ होते, मिरची मध्ये गेरू पाचक रसा दुर्बल करते, व्याधी पाहते घेरू दवादारू महाग झाली,आतून काळीज पिरडी गरिबाघरी कँसर आला, बांधून ठेवा तिरडी मुक्ती मागे रोगी सत्वर,अन यमास नसते घाई
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.