Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शबरी :- किरण डोंगरदिवे

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
पद्यकविता

शबरी

शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी;
चिलीपिली तिच्याभवती गोंगाट करत भारी .

टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी;
म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी .

जशी जशी भवताली पोरं होत गोळा;
तसतसा हरखुन जाई तिचा जीव भोळा .

‘चार आण्याला मूठभर’ भाव होता रास्त;
विकत घेण्यापेक्षा पोरं चाखून बघत जास्त!

कुणीतरी सांगे ‘तिचा परदेशात असतो लेक;
दर महिन्याला पाठवतो दहा हजारांचा चेक !’

गुरुजींनी विचारलं एकदा ठरवून काहीतरी;
‘बोरं का विकता? रग्गड पैसा आहे ना घरी ?’

हताश हसून ती म्हणाली ‘काय सांगू लेकरा तुला;
गोजिरवाणा एक नातू बी आहे परदेशात मला...

...पण अजून तरी मी त्याला पाह्यलेलं नाही;
माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही.

...म्हणुन मी शाळेपुढं बोरं विकते अशी;
न पाह्यलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी !’

म्हातारीच्या ममतेचा चेक सांगा कधी वठेेल...?
बोर रानातील वाळली! तिला नातू कधी भेटेल ? 

-* किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर मेहकर, ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301 मोबा 7588565576
& 7057465576

Share

प्रतिक्रिया

  • Kiran dongardive's picture
    Kiran dongardive
    शनी, 24/09/2016 - 11:37. वाजता प्रकाशित केले.

    आज गावागावातून मोजक्याच का होईना पण शेतकऱ्याची काही मुलं शहरात किंवा प्रसंगी परदेशातही स्थायिक झाली आहेत. ह्यात कधी कधी सुख शोधताना एखादं अनोळखी दुःख समोर येत ते व्यक्त करताना कधी कधी साध्या शब्दातून ते मांडता येत त्याचा हा एक प्रयत्न

    किरण शिवहर डोंगरदिवे

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 29/09/2016 - 12:08. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
    अभिनंदन....! Congrats Congrats

    शेतकरी तितुका एक एक!