नका घेऊ गळफास

गंगाधर मुटे's picture

नका घेऊ गळफास

किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!

हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!

                                 - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया

Nilesh's picture

वाह... सुंदर

गंगाधर मुटे's picture

धन्यवाद निलेश सर

गंगाधर मुटे's picture

काल शेतकर्‍यांच्या नवयुवक पुत्रांनी "आत्मक्लेश अभियान" करून शासन व्यवस्थेविरुद्ध तुतारी फ़ुंकली. ३५ वर्षापूर्वी शरद जोशींनी लावलेल्या रोपट्याला आता फ़ळे धरायला लागली, असा संकेत मिळत आहे.
तुतारी फ़ुंकण्यासाठी तयारी करणार्‍या Abhijeet Arunrao Falke , shivkumarji chandak, Gajanan Borokar आणि Vilas Tathod यांना ही कविता अर्पण करत आहे.

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विनिता's picture