नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

* नावहीन गाववेद्ना* : प्रवेशिका

Raosaheb Jadhav's picture
लेखनविभाग: 
पद्यकविता

।*नावहीन गाववेदना*।
जगायचा हिशोब गड्या
तुझ्यापुढे मांडतो आहे
विखुरलेल्या गवताची
काडीकाडी बांधतो आहे........1

बांधावरल्या भांडणातच
पिढ्या साऱ्या झाल्या खोरी
अज्ञानाचे वाढवीत तण
दलालांच्या पिकल्या बोरी........2

राजकारण गावकीचे
भावकीचेही उसवी टाके
हाती धरल्या फावड्याने
भावाचेच फोडतो डोके.........3

वास भिजत्या मातीचा
बेंबीदेठी भिनला पाहिजे
शेजाऱ्याच्या वावरातही
वारस तुझा रांगला पाहिजे.......4

एकोप्याचे मांड गणित
कानामनात कर पेरणी
जागतिकीकरणासाठी
बांधाबांधात कर बांधणी.........5

मातीपोटी पोसले वैर
मुळ्या उकरुन खांडतो आहे
नावहीन गाववेदनेतून
हुंकार नवा सांडतो आहे.........6
* रावसाहेब जाधव(चांदवड)*
(9422321596)

Share

प्रतिक्रिया