नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!

गंगाधर मुटे's picture
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो

जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना......
ऋणानुबंधाच्या
मुसळधार पावसासारख्या
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!

                             - गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित कविता

मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

अटी-शर्ती काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Share

प्रतिक्रिया

 • विनिता's picture
  विनिता
  सोम, 03/08/2015 - 15:09. वाजता प्रकाशित केले.

  व्वा छान Smile


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 03/08/2015 - 20:40. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद विनिताजी,

  कालच्या मैत्रीदिनाच्या धबडग्यात या कवितेचे मातेरे झाले आहे. या कवितेवर फेसबूक आणि व्हाटसअ‍ॅपवर फारसे प्रतिसाद आले नाहीत, याची खंत नाही मात्र ही कविता वाचलीच गेली नाही याची, एवढा अदमास आल्याने जरा हिरमोड झालाच.

  यापुढे कोणत्याही दिनाच्या निमित्ताने नवीन कविता लिहायची नाही आणि लिहिलीच तर त्या दिवशी अजिबात प्रकाशित करायची नाही, या निर्णयाप्रत मी आलेलो आहे. Smile

  ही कविता उत्कृष्ट कविता आहे, याची माझी मलाच खात्री आहे.

  शेतकरी तितुका एक एक!


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 05/08/2018 - 11:08. वाजता प्रकाशित केले.

  मैत्रिदिनाच्या मंगलमय शुभेच्छा

  शेतकरी तितुका एक एक!


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 07/08/2018 - 11:37. वाजता प्रकाशित केले.

  https://www.facebook.com/satish.borulkar/videos/1963372080385847/
  धन्यवाद Satish Borulkar सर! माझ्या कवितेचे सोने केलंय तुम्ही!!

  शेतकरी तितुका एक एक!