नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

कृषिदिनानिमित्त काय करावे?

गंगाधर मुटे's picture

आज कृषिदिन आहे म्हणे!
खरं खोटं देव जाणे!!

पण असेल तर तो साजरा कसा करावा, हा मला पडलेला पेच आहे.

कृपया मार्गदर्शन करावे!
*********

मला सुचलेल्या काही बाबी.

१) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल फ़टाके फ़ोडून "वामनोत्सव" साजरा करावा?.
२) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल निषेध म्हणून "वामनदहन" करावे?.
३) शेतकर्‍यांना लाठ्या घातल्यावद्दल भाजप सरकारचे अभिनंदन करावे?.
४) शेतकर्‍यांना गोळ्या घालून मुडदे पाडल्यावद्दल कॉंग्रेस पक्षाचे अभिनंदन करावे?.
५) सरकारने या निमित्ताने गाजर वाटायचा कार्यक्रम घेतला तर रांगेत जाऊन उभे राहावे?.
६) पगारी शासकीय मार्गदर्शकांनी "मार्गदर्शन शिबीर" आयोजित केले तर भक्तिभावाने प्रवचन ऐकण्यासाठी मेंदू घरी ठेवून ऐकायला जावे?.
७) शेतमालास "आधारभूत किंमती" जाहिर केल्याबद्दल दिल्लीश्वराचे पाय चेपावे?.
८) सोशल मिडियावर ”कृषिदिनानिमित्त शेतकर्‍यांना हार्दीक शुभेच्छा!" असे स्टेटस टाकून आपण शेतकरीप्रेमी आहोत, हे व्यक्त करावे?.
९) "आम्हाला एखाद्या महामंडळावर घ्या" म्हणून मुंबईश्वराला साकडे घालावे?
किंवा
१०)
मी शपथ घेतो की,
शेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून
त्यांना देशातील
इतर नागरीकाप्रमाणे
सन्मानाने व सुखाने जगता यावे
याकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’
या एक कलमी कार्यक्रमासाठी
संघटनेचा पाईक म्हणून
मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.
या प्रयत्नात
पक्ष, धर्म, जात वा
इतर कोणत्याही भेदाभेदांचा
अडथळा येऊ देणार नाही.

अशी शपथ या दिनाच्या निमित्ताने पुन्हा नव्याने घेऊन नव्या लढाईसाठी स्वत:ला तयार करावे?

कृपया मार्गदर्शन करावे!

आपला नम्र
गंगाधर मुटे

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share