नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

admin's picture
वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन
* वायगाव चौरस्त्यावर वाहने थांबवून प्रवाशांना दिले फूल व माहितीपत्रक
* विदर्भाचा अनुशेष पोहोचला ७५ हजार कोटींवर

वर्धा (लोकमत प्रतिनिधी) : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती घडवून आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलेल्या निर्देशानुसार वायगाव (नि.) चौरस्ता व जाम येथे प्रतिकात्मक पानफुल आंदोलन केले. ०१/०४/२०१५ रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत चाललेल्या या आंदोलनात बसेससह सर्व वाहने थांबवून प्रवाशांना फूल व माहितीपत्रक देऊन वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज समजाऊन सांगण्यात आली. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन तीव्र करण्यासाठी जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले.
५४ वर्षे महाराष्ट्रात राहून आणि २0 वर्षांपूर्वी वैधानिक विकास मंडळाची स्थापना होऊनही विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भ निर्मितीच्या वेळी करण्यात आलेला नागपूर करार पाळण्यात आला नाही. लोकसंख्येच्या तुलनेने विदर्भासाठी आर्थिक तरतूद करण्याचे वचन सत्ताधार्‍यांनी कधीच पाळले नाही. यामुळे विदर्भप्रदेश ओसाड झाला. अनुशेष (बॅकलॉग) ७५ हजार कोटींनी वाढला. शेतीमालास रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. औद्योगिक विकास न झाल्याने बेरोजगारी वाढली. सिंचनाची सोय न झाल्याने शेतीतील गरिबी वाढली. आदिवासीबहूल क्षेत्रातील कूपोषण वाढले. गरजेपेक्षा दुप्पट वीज निर्मिती विदर्भात होऊनही भारनियमन वाढले. नक्षलवाद वाढला. विदर्भात वायूप्रदूषण वाढले. यामुळे श्‍वसनरोगाचे गंभीर आजार वाढले. रोजगारीच्या शोधात वैदर्भीय जनता स्थलांतर करीत असल्याने राज्याची लोकसंख्या वाढत असूनही विदर्भाची लोकसंख्या घली. यासह अन्य बाबींची प्रवाशांना जाणीव करून देण्यात आली.
आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सरोज काशीकर, महासचिव गंगाधर मुटे, दत्ता राऊत, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शेख बाबा, संध्या राऊत, डॉ. सुधाकर महाकाळकर, डॉ. पोकळे, अरविंद राऊत, गणेश मुटे, नारायण होले, शांताराम भालेराव, संतोष लाखे, निलेश फुलकर, भारत लाखे, रवींद्र दांडेकर, प्रवीण पोहाणे, विनोद काळे, अजय फुलझेले, खुशाल हिवरकर यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले.

■ ५४ वर्षांपासून विदर्भ महाराष्ट्रात आहे. शिवाय २0 वर्षांपूर्वी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली; पण अद्याप विदर्भाचा विकास होऊ शकला नाही. विदर्भ निर्मितीच्या वेळी केलेला नागपूर करारही पाळण्यात आला नाही. लोकसंख्येच्या तुलनेने विदर्भासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली नाही. यामुळे विदर्भाचा अनुशेष ७५ हजार कोटींनी वाढला. शेतीमालास रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्यांतही वाढ झाली. या सर्व बाबी वायगाव तसेच जाम चौरस्ता येथे पानफुल आंदोलन करून प्रवाशांना समजावून सांगण्यात आल्या.
*******
jay Vidarbha
*******
jay Vidarbha
*******
jay Vidarbha
*******
jay Vidarbha
*******
jay Vidarbha
*******

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share