Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



सापळा पिकातून साधू कीडनियंत्रण


सापळा पिकातून साधू कीडनियंत्रण


डॉ. युवराज शिंदे (Ph.D. कृषी कीटकशास्त्र )

कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिके ही सेंद्रिय शेतीमधील अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांचा वापर योग्य प्रकारे केल्यास किडींना पिकापासून दूर ठेवणे शक्यए होते.

सापळा पीक कशास म्हणतात?

मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी व्हावे, याकरिता किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होऊन मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना "सापळा पिके' म्हणतात.

सापळा पीक वापरण्याची तत्त्वे :
1) मुख्य पिकाच्या शेतातील मुदतीच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
2) काही सापळा पिकांच्या विक्रीतून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्याचाही विचार व्हावा.
3) सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात.
4) सापळा पिकांवरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून नष्ट करावे.

विविध पिकांतील सापळा पिके :

- प्रत्येक कपाशीच्या ओळींनंतर दोन ओळी मका किंवा चवळीची पेरणी करावी. चवळीवर मावा मोठ्या प्रमाणावर येत असल्यास त्यावर जगणारे क्रायसोपा, लेडी बर्ड बिटल, सिरफीड माशी इ. मित्रकिडींची वाढ जोराने होते व मावा या शत्रू किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत मिळते.
- कपाशीमध्ये 10 व्या किंवा 11 व्या ओळीत भगर या पिकाची एक ओळ टाकल्यास भगरीच्या कणसातील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणीसारखे पक्षी आकर्षित होतात, त्यासोबत त्या पिकावरील उंटअळ्या, हेलिकोवर्पा, स्पोडोप्टेरा इ. किडींच्या अळ्याही वेचून खातात, त्यामुळे किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.
- कपाशीभोवती झेंडू या सापळा पिकाची एक बॉर्डर लाइन घ्यावी. सापळा पिकाचे अंतर मुख्य पिकाप्रमाणे घेतल्यास आंतरमशागत करताना सापळा पिकाचे नुकसान होणार नाही. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो; तसेच झेंडूच्या मुळांमधून सूत्रकृमींना हानिकारक अल्फा टर्थिनील (alfa tertheinyl) हे रसायन स्रवते, त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. फुलांपासून शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळते.
- कपाशीभोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची बॉर्डर लाइन घ्यावी. एरंडीचे अंतर कपाशीप्रमाणे घ्यावे. स्पोडोप्टेराचा व उंटअळीचा मादी पतंग एरंडीच्या मोठ्या पानांवर अंडी घालतो. असे अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट केल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते.
- सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकांची एक-एक बॉर्डर ओळ लावावी. अंतर सोयाबीनप्रमाणे 45 सें.मी. घ्यावे. एरंडी आणि सूर्यफुलाच्या मोठ्या पानांवरील स्पोडोप्टेरा, उंटअळी आणि केसाळ अळीची अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
- घाटे अळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुरीच्या चार ओळींनंतर ज्वारीच्या दोन ओळी असे आंतरपीक घ्यावे.
- तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात 1 टक्का ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. अर्थात तुरीचे बियाणे 10 किलो असल्यास त्यात 100 ग्रॅम ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी, त्यामुळे मित्र पक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा फडशा पाडतील.
- टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी व सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरिता टोमॅटो पिकाच्या बॉर्डरलाइनने मुख्य पिकाच्या अंतरानुसार झेंडूची एक ओळ सापळा पीक म्हणून लागवड करावी.
- तंबाखूच्या रोपवाटिकेभोवती बॉर्डरलाइनवर एरंडीची एक ओळ लागवड केल्यास स्पोडोप्टेराचा मादी पतंग एरंडीवर समूहाने अंडी घालतो. असे अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
- भुईमूग या पिकाच्या बॉर्डर लाइनने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड केल्यास केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटे अळी या किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत.

सापळा पिकाचे फायदे
मित्रकीटकांचे संवर्धन होते.
- पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारता येते.
- पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
- माती व पर्यावरणाचे संवर्धन होते.


विविध पिकांतील सापळा पिके


पीक -- सापळा पिके/ आंतरपिके --उपयोग/ कीड नियंत्रण
कपाशी -- चवळी, कोथिंबीर, मका,-- मित्रकीटक संवर्धन
कपाशी -- झेंडू-- हिरवी बोंड अळी, सूत्रकृमी नियंत्रण
सोयाबीन --एरंडी, सूर्यफूल-- स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळ अळी नियंत्रण
सोयाबीन --मका-- पांढरी माशी नियंत्रण व मित्रकीटक संवर्धन
तूर --ज्वारी (आंतरपीक 4:2)-- घाटे अळी, सूत्रकृमी नियंत्रण
तूर (सलग) --ज्वारी 1 टक्का (10 कि. तूर+100 ग्रॅम ज्वारी)-- मित्रपक्ष्यांना आकर्षित करण्याकरिता
कपाशी --भगर, ज्वारी किंवा बाजरी-- मित्रपक्ष्यांना आकर्षित करण्याकरिता
भुईमूग -- सूर्यफूल-- केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटे अळी

संपर्क – डॉ. युवराज शिंदे (Ph.D. कृषी कीटकशास्त्र ) (9763063179

)

Share