नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको

संपादक's picture
लेखनप्रकार : 
शेतकरी संघटना

वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको

प्रतिनिधी / चंद्रपूर

कोळसा व वेकोलि या दोन्ही बाबी केंद्र व राज्य शासनाच्या अख्यातरित येतात. तर त्यापासून तयार होणारी ऊर्जा हे राज्य शासनाच्या नियंत्रणात येते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात राज्य सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव बिलासोबत वेगळ्या विदर्भाचेही बिल संसदेत ठेवावे, अशी मागणी रेटून धरीत येत्या १६ डिसेंबरला नागपूर येथे मतदान घेवून जनमताचा कौल बघितला जाणार आहे. येत्या काळात जिल्हास्थानी मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या मतदान प्रक्रियेत प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन अँड. वामनराव चटप यांनी केले.
आज गुरूवार(१२ डिसेंबर) ला क्रांतीकारक बाबू गेनू या स्मृतिदिनी वेगळया विदर्भासाठी चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर घुग्घुस येथे करण्यात आलेल्या कोळसा रोको आंदोलनात ते बोलत होते.
आंदोलनात किशोर पोतनवार, प्रभाकर दिवे, प्राचार्य अनिल ठाकूरवार, अशोक मुसळे, अंकुश वाघमारे, श्रीधर बल्की, गोविंद मित्रा दिपक चिल्लावार, यशोधरा पोतनवार, शैलेजा देशपांडे, गंगाधर मुटे, देवराव पाटील धांडे यांच्यासह ३८ सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अँड. वामनराव चटप म्हणाले, समितीने ठरविलेल्या आंदोलनाच्या मालिकेनुसार ५ व ६ डिसेंबररोजी नागपूर येथील रॉयल पराते सभागृहात स्वतंत्र विदर्भाचे पहिले अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात सुप्रसिद्ध वित्ततज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भाचा ४५११० कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारचे कर न लावता सरकारकडे विकासासाठी ११० कोटी रुपये असल्याचे दाखविण्यात आले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर कराराची होळी, विदर्भाच्या सर्व सीमेवर फलक लावण्यात आले आहेत. तसेच विदर्भातील खासदरांच्या भेटी घेऊन त्यांना संसदेत स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरण्याची विनंती करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान केवळ चंद्रपूर आणि नागपूर येथील खासदारांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या. पण रामटेक येथील खासदारांनी तर चक्क भेटण्यास मज्जाव केला होता. या आंदोलनानंतर काही खासदारांनी संसदेच्या शून्य सत्रात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायर्‍यांवर सोमवारी पाच माजी आमदारांनी व एका विद्यमान आमदारांनी बसून, वेगळ्या विदर्भाचे निवेदन सर्वांनाच सादर केले. आता येत्या १६ डिसेंबरला वेगळ्या विदर्भासाठी मतदान घेऊन विदर्भाची बाजू, विदर्भाच्या विरुद्ध व महाराष्ट राज्य अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया होईल. यानंतर पुन्हा विदर्भासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
घुग्घुस बसस्थानक परिसरातील गोदावरी मंगल कार्यालयासमोरून हजारो महिला-पुरूष कार्यकर्त्यांची रॅली वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली निघाली. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, लाठी, गोली खायेंगे, विदर्भ राज्य लेके रहेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. राजीव रतन चौकातील घुग्घुस-ताडाळी रेल्वेमार्ग व घुग्घुस साखरवाही ताडाळी रस्त्यावर धरणा दिला.
रेल्वे व इतर वाहन दीड तास थांबविल्याने घुग्घुस - चंद्रपूर - वणी व साखरवाही ताडाळी मार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
(लोकमत व लोकशाही वार्तावरून साभार)
------------------------------------------------------------
kolsa Roko
****
Ghuggus
****
कोळसा रोको
****
घुग्गुस
*****
वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको - Zee News

बातमी ऐकण्यासाठी/पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Share