नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

नागपूर कराराची होळी

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
विदर्भराज्य

विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी

लोकमत-वर्धा :

हिंगणघाट येथे विदर्भ जॉर्ईंट अँक्शन कमिटीचे नेतृत्वात येथील डॉ. आंबेडकर चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ६३ जणांना दुपारी २ वाजता स्थानाबद्ध केले.
यात मधुसूदन हरणे, धर्मराज रेवतकर, रिपाइंचे अशोक रामटेके, बसपाचे गोकुल पाटील, किसन क्रांतीचे संतोष तिमांडे, लोजपाचे किशोर तितरे, शेतकरी संघटनेचे साहेबराव येंडे, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, आमआदमी पार्टीचे मनोज रूपारेल यांच्यासह ६३ जणांना पोलिसांनी मुपोका ६८ अन्वये स्थानबद्ध करून ६९ अन्वये ३ वाजता सोडून दिले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे यांच्या मार्गदर्शनात केली.
वर्धेत बजाज चौकात संयुक्त विदर्भ आघाडीच्यावतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटना व रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, शेतकरी संघटना माजी जिल्हाप्रमुख सतीश दाणी, शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हा प्रमुख सचिन डाफे, अजय मेहरा, प्रकाश पाटील, सुरेंद्र पुनवटकर, देवानंद तेलतुंबडे, विलास मून, विजय नगराळे, राजू वासेकर, गजानन निकम, सतीश इंगळे, गौतम डंभारे, संजय वर्मा, गोपाल सिदपा, संजय गवई, राजेंद्र नाखले, दत्ता राऊत यांच्यासह शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वतंत्र भारत पक्ष, विदर्भ जॉईंट अँक्शन कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क) काय आहे नागपूर करार? ■ विदर्भाला भाषिक आधारावर संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेणार्‍या घटनेला ६0 वर्षे पूर्ण झाली. २८ सप्टेंबर १९५३ रोजी संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी एक करार नागपूर येथे करण्यात आला. या करारानुसार विदर्भाला २३ टक्के लोकसंख्येच्या आधारावर निधी वाटप नोकरी धंदे व अन्य सर्व विकास कामांमध्ये २३ टक्के वाटा देण्याचे मुख्य तत्व मान्य करण्यात आले होते; परंतु आज ६0 वर्षानंतर विदर्भाची स्थिती ही भयावह आहे.
-----------------------------------------------------------
लोकशही वार्ता- शहर प्रतिनिधी/हिंगणघाट

नागपूर करारात वेगळा विदर्भ व्हावा, याची स्पष्ट तरतूद असताना अनेक वर्षांपासून राज्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. या कराराला आज ६0 वर्षे पूर्ण झाले असून दि. २८ सप्टेंबर रोजी विदर्भ जाँईट अँक्शन कमिटीच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली.
नागपूर कराराच्या प्रतीची होळी सुरू असतानाच पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ अँक्शन जाँईट कमिटीचे जिल्हा संयोजक मधूसुदन हरणे, धर्मराज रेवतकर, रिपाइंचे अशोक रामटेके, बसपाचे गोकूूल पाटील, विदर्भ किसन क्रांतीचे संतोष तिमांडे, लोकजनशक्ती पार्टीचे , शेतकरी संघटनेचे प्रमुख साहेबराव येडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे अशा एकूण ३३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक करून सायंकाळी मुक्तता केली. मधुसूदन हरणे विदर्भ प्रमुख शेतकरी संघटन धर्मराज रेवतकर, गंगाधर मुटे, अध्यक्ष शेतकरी संघटना वर्धा जिल्हा अशोक रामटेके, नरेश खडसे, संजय ढाले, कमलाकर भोयर, भोजराज बुरघाटे, सुनील हिवसे, अनिल भोंगाडे पाणीपुरवठा सभापती न. प.हिंगणघाट यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------------------------------------
Vidarbh
---------------------------------------------------------
Vidarbh
---------------------------------------------------------
Vidarbh
---------------------------------------------------------

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share