जात्यावरील ओव्या

Malubai's picture
काव्यप्रकार: 
जात्यावरची गाणी

जात्यावरील ओव्या

वळीव पाऊस, जमिनिबाइचा आला पती
पंचारती करुनी ,मेघराजाला ओवाळीती .

वळीव पावसाच ,ढग धरल कोसावरी ,
बरस मेघराजा ,बंधू माज्याच्या उसावरी .

वळीव पावसाची ,वीज झालीया कावरी ,
बंधूच्या शेतावारी ,कुरी चालली नवरी .

वळीव पावसान ,सार शिवार गार झाल ,
धर्तीच्या लेकरान ,आभार देवाच मानल .

वळीवाचा पाउस , बालीराज्याचा जिवलग ,
पेरणीच दिवस ,मेघाराज्याची लगबग.

मालुबाई