नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

दारूची नशा

विश्वजीत गुडधे's picture
काव्यप्रकार: 
कविता


दारूची नशा


दारूची आहे ही अजब नशा 
करिते ही भल्याभल्यांची दुर्दशा

जेव्हा लोक चिंतेने असतात ग्रस्त 
तेव्हा दारू पिऊन होतात सुस्त 

दारूने झाले कित्येक परिवार बरबाद 
तर काही झाले जीवनातून 'बाद‘

नवरा राहतो दिवसरात्र दारूपाशी 
मुलं-बाळ मात्र राहतात उपाशी

दारूत नवऱ्याने केला पैसा नष्ट 
मग खावं लागलं लोकांचं उष्ट 

मद्यपी म्हणून समाजाने मारला शिक्का 
बायको- पोरं सोडून गेल्याने बसला धक्का

सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती  
ही घडवेल मानवाची अधोगती 

नसावे कोणतेही जीवन दारूयुक्त 
तरच होईल भारत व्यसनमुक्त

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 03/09/2011 - 16:38. वाजता प्रकाशित केले.

  सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
  ही घडवेल मानवाची अधोगती

  हे कडवे सोडून बाकी कविता चांगली आहे. Smile

  शेतकरी तितुका एक एक!


 • विश्वजीत गुडधे's picture
  विश्वजीत गुडधे
  शनी, 03/09/2011 - 19:10. वाजता प्रकाशित केले.

  यामागील कारण काय आहे?


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 03/09/2011 - 19:43. वाजता प्रकाशित केले.

  सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
  ही घडवेल मानवाची अधोगती

  मानवाची अधोगती होत असेल तर ती सर्वच प्रकारच्या दारुमुळे होते. मग ती द्राक्षाची असो, मोहफुलाची असो, फळांपासूनची असो की धान्यापासून असो.

  दारू वाईट असतेच. ती कशापासूनही तयार होणारी असो. किंवा देशी असो की विलायती असो.

  वरील कडव्यात धान्यापासून असा शब्द आल्याने त्याचा अर्थ वेगळा जातो. Smile

  शेतकरी तितुका एक एक!


 • विश्वजीत गुडधे's picture
  विश्वजीत गुडधे
  शनी, 03/09/2011 - 22:19. वाजता प्रकाशित केले.

  ठिक आहे