नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

वादळाची जात अण्णा

गंगाधर मुटे's picture

वादळाची जात अण्णा

माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा

भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा

एक आशेचा उमाळा, शोधताहे देशवासी
चेतना चिंतामणीची, भासते बरसात अण्णा

आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा

                                                        - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------

Anna Hajare
Anna Hajare

Anna Hajare

-----------------------------------------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया

 • Suresh Shirodkar's picture
  Suresh Shirodkar
  शनी, 27/08/2011 - 18:37. वाजता प्रकाशित केले.

  आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
  अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा

  व्वा!! सुन्दर.

  "इंडियाला" ऐवजी "भारताला" चालल असत ना?


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 27/08/2011 - 19:03. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार,
  बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे. Smile

  अण्णांच्या विचारसरणीत मला "इंडिया" दिसतो. "भारत" दिसत नाही.
  पण या क्षणी आंदोलन सुरू असताना हा वाद नको.
  आपण आंदोलन संपले की मग या विषयावर चर्चा करू. Smile

  ----------------------------------------------------------------------
  अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!

  शेतकरी तितुका एक एक!


 • अनिल रत्नाकर's picture
  अनिल रत्नाकर
  रवी, 28/08/2011 - 22:34. वाजता प्रकाशित केले.

  गझल सुंदर आहेच.
  तसे तुम्ही तुमच्या साहित्यातुन, काव्यातुन, नागपुरी तडक्यातुन
  समाजजागृती करतच असता.
  माझ्या बाळबोध लेखनालाही आपण प्रतिसाद देता हा आपला मोठेपणा.
  धन्यवाद.

  अनिल रत्नाकर