नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

हिरवळ म्हणजे काय?

Pratik Raut's picture
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८

हिरवळ-हिरवळ-हिरवळ,
हिरवळ म्हणजे काय?
मुलगा विचारेल आपल्याला,
बाबा माणूस असतो की काय।

जगण्यासाठी आवश्यक आहे,
जगायला पाहिजे एकतरी झाड
लहानपणी आपण खेळलो,
खेळातीलन मूल त्याच्या आड।

प्रश्न होईल उभा,
जेव्हा नसेल एकही झाड।
मुलगा विचारेल बाबाला,
हिरवळ म्हणजे काय?

कमी आहे प्राणवायू,
या पृथ्वीवर प्राण्यांसाठी।
घ्या एक एक झाड,
आणि जगवा आपल्या मुलांसाठी।

प्रश्न उभा होणार नाही,
जेव्हा दिसेल त्याला झाड।
उत्तर येईल त्याच्याकडून,
बाबा-बाबा हिरवळ म्हणजे काय।

खूप आनंद होईल मला,
जेव्हा माहित होईल' हिरवळ म्हणजे काय?
तेव्हाच माहित होईल मुलांना,
कि हिरवळ म्हणजे झाड।।।

प्रतिक राऊत
8551895884
pratikraut205@gmail.com

Share