नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

शेतकऱ्याचे राजकारण

Pratik Raut's picture
काव्यप्रकार: 
कविता

सकाळ पासून जातो,
दिवसभर राहतो।
तेच काम करतो,
संध्याकाळी घरी जातो।

आजकालच्या मुलीमुलांना,
शेती करण्याचा जातो त्रास।
तरीसुद्धा घेतात,
परीक्षेमध्ये झिरो मार्क्स।

वर्षभर काबाडकष्ट,
करतो तो शेतकरी।
संपूर्ण देश जागवतो,
तो एकटाच शेतकरी।

सगळ्यात सुखी आहे,
तोच शेतकरी ।
दिवसभर काम करून,
येतो आपल्या घरी।

पाहतो आभाळाकडे,
या रानातला शेतकरी।
पाहून मानतो कधी करीन,
या शेतीमध्ये पेरणी।

एकदा पाऊस पडला,
केली त्यानं पेरणी।
दुसरा पाऊस पडला नाही,
रिकामी झाली त्याची भरणी।

शेतकरी कधीच घाबरत नाही,
कोणत्याच परिस्थितीला।
कारण शेतकऱ्यांना माहित असते,
कशी मात द्याची त्याला।

शेतकऱ्यासारखं कोणी करत नाही,
काम महान।
पण सगळेच समजते,
त्या कामला महान।

Pratik Raut
8551895884

Share