नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

बैल म्हणाले

आशिष आ. वरघणे's picture

*बैल म्हणाले*

लंगलंग भिकारी भिक मांगतो दुपारी
सरकारचे धोरणं हाये बोचणारी तुतारी

अवशिद पाणी घेण्या नाई खिशात नाणी
बोंड अळीचा थैमान बाप्पा डोयात पाणी

तापानं फनफनलं पोट्ट बायको बिमार
गरीबाच्या चड्डीले पह्ययलेच भोकं हजार

डुक्कर रोह्यांनी कुचकरले लेकुरवाळे पीक
सांगा आता सोट्याले मांगा सरकारले भीक

कायदे असे केले जसे पाहुणचार सोईचे
आपल्या देखता कापले गळे लाचार आईचे

राबणारा खंगत गेला खाणारा पोकत गेला
अशा व्यवस्थेपाई परवा एक बाप फासाने मेला

आता नका अंत पाहू कै पर्यंत असे राहू
बैलं म्हणाले काल, "चला मालक मिळून साहू".

- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share