नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सरावन / श्रावण

ravindradalvi's picture
लेखनप्रकार : 
अवांतर

सरावन / श्रावण (वर्हाडी बोली )

सरावनाच्या झळीची
नवलाई जगताले
समिंदराच्या भेटीले
धावे नदी पये नाले

धुसपूस करे वारा
पाता फुलाच्या कानातं
फुलपाखराचा खेय
रंगे हिरव्या रानातं

उन पावसाचा खेय
लूकाछुपिचं तंतर
पाणी भिजोते उनाले
कोन मारतो मंतर

देतो भरोसा सार्याले
तनामनाले जागोतो
बेल पानाचे बी लाळ
भोया संकर पुरोतो

आने धरतीले खेव
असा करतो लगट
कोन्ता उदास पदर
शिलगतो वोलागट

उगा जल्मतं नसते
कदी पावसाचं गानं
सादयल्या कायजातं
गाभुयतो सरावन

रवींद्र अंबादास दळवी नाशिक

Share