नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अंगारवाटा : दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन

Sudhir Bindu's picture
शरद जोशी यांचे जीवन चरित्र वाचुन हजारो शरद जोशी निर्माण व्हावेत :- श्रीनिवास खांदेवाले
 
अंगारवाटा : दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन
 
शोध शरद जोशींचा या शरद जोशी यांच्या जीवन चरित्राच्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांच्या हस्ते नागपुर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन या चरित्राचे लेखक श्री भानु काळे ,शेतकरी संघटना ट्रस्टचे अध्यक्ष रवीभाऊ काशीकर,शेतकरी संघटकचे संपादक प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे, माजी आमदार वामनराव चटप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट,स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अँड दिनेश शर्मा ,शेतकरी महिला आघाडीच्या गीता खांदेभराड,युवा आघाडीचे सतीश दाणी ,गुणवंत पाटील ,राम नेवले यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड दिनेश शर्मा यांनी केले .या वेळी बोलतांना श्री खांदेवाले यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेतला.
Angarwataशरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन देशातील राजकीय लोकांना दिशा देणारे होते .देशातील शेतकऱ्यांचे मत जाणुन घेण्यासाठी होऊ घातलेले पंतप्रधान शरद जोशी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याची आठवण त्यांनी सांगितली.देशातील अर्थकारण व राजकारण यांना शरद जोशींं मुळे वेगळे वळण मिळाले असुन त्यांनी महिलांना सन्मान देऊन समाजात बरोबरीचे स्थान देणाऱ्या लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत शरद जोशी यांनी रावेरी येथे सीतेचे मंदीर बांधुन सीतेलाही सन्मान दिल्याचे सांगितले. शरद जोशी हे द्रष्टे नेते होते त्यांनी एक नवी संस्कृती निर्माण केल्याचे ही त्यांनी सांगितले .लोकांच्या मनासोबतच त्यांच्या लग्नपत्रिकेवर मानाचे स्थान मिळवणाऱ्या शरद जोशींचे जीवन चरित्र वाचुन हजारो शरद जोशी निर्माण व्हावेत अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली . या चरित्राचे लेखक भानु काळे यांनी आपल्या मनोगतात या चरित्र लेखन करतांना आलेले अनुभव व्यक्त करुन शरद जोशींचे स्मारक व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली .
 
यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष रवीभाऊ काशीकर ,माजी आमदार वामनराव चटप सौ सरोज काशीकर ,सौ. शैला देशपांडे अनिल घनवट यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा डॉ. मंजुषा ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन शेतकरी संघटनेचे विदर्भ विभाग प्रमुख मदन कामडे यांनी केले .या वेळी राज्यभरातुन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व नागपुर येथील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते .
 
फोटो :- अंगारवाटा ...शोध शरद जोशींचा या जीवन चरित्राच्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन नागपुर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
शेतकरी संघटना समाचार
File attachments: 
Share