नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

स्वतंत्र भारत पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची बैठक

Sudhir Bindu's picture
स्वतंत्र भारत पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची बैठक संपन्न
 
नागपुर : राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची एक दिवसीय बैठक नागपुर येथील आमदार निवासाच्या सभागृहात दि.३०एप्रिल रोजी संपन्न झाली .या बैठकीत राज्यभर पक्षाची बांधणी व येणाऱ्या निवडणुकांच्या संबधीने चर्चा करण्यात आली .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप हे होते तर माजी आमदार सौ सरोज काशीकर,प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे, स्वभापस्वतंत्र भारत पक्षाचे राज्य अध्यक्ष अँड दिनेश शर्मा ,गुणवंत पाटील, सरचिटणीस गंगाधर मुटे ,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट ,स्वतंत्र भारत पक्षाच्या युवा आघाडीचे सुधीर बिंदु ,शेतकरी महिला आघाडीच्या गीता खांदेभराड ,युवा आघाडीचे सतीश दाणी ,राम नेवले, ललीत बहाळे यांच्या सह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते .या बैठकीचे प्रास्ताविक अध्यक्ष अँड दिनेश शर्मा यांनी केले या वेळी गेल्या चार निवडणुकांमध्ये स्व.भा.प.च्या वतीने लढण्यात आलेल्या जागांचा आढावा सुधीर बिंदु यांनी दिला तर गुणवंत पाटील यांनी पक्षाच्या मान्यते बाबत चालु असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली .केंद्रीय निवडणुक आयोगाकडे पक्ष नोंदणीकृत असुन त्या नोंदणीवर स्वतंत्र भारत पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुक लढता येणार असल्याचे सांगितले.या वेळी जिल्हावार आढावा घेऊन लढवण्या योग्य जागांची निश्चिती करण्यात आली.या वेळी स्वतंत्र भारत पक्षाच्या झेंड्यावर चर्चा करुन झेंड्यास मान्यता देण्यात आली .या वेळी माजी आमदार सौ सरोज काशीकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी स्वतंत्र भारत पक्षाने कृषी धोरणावर निवडणुक लढवावी अशी अपेक्षा पक्षाकडे व्यक्त केली .या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा .मानवेंद्र काचोळे यांनी व्हीडीओ काँन्फ्रसिंगवरुन उपस्थितांशी संवाद साधला .या बैठकीचा समारोप माजी आमदार वामनराव चटप यांच्या जोशपुर्ण भाषणाने करण्यात आला.या भाषणात चटप यांनी शरद जोशी यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत पक्ष उभा करण्यासाठी पक्षाने दोन खासदार ,दहा आमदार व सहा टक्के मता साठी प्रयत्न करावेत असे आवहान करुन स्वतंत्र भारत पक्षाची सदस्य नोंदणी ग्रामीण भागासह शहरी भागातुन करण्याचे आवाहान केले. या बैठकीसाठी राज्यभरातुन स्वतंत्र भारत पक्षाचे नेते व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
फोटो :- स्वतंत्र भारत पक्षाच्या राज्य कार्यकारीणी च्या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना माजी आमदार वामनराव चटप
शेतकरी संघटना समाचार
File attachments: 
Share