नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेतकरी संघटना मोबाईल ऍप

गंगाधर मुटे's picture

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
बदलत्या नवतंत्रज्ञानाच्या युगात शेतीविषय सर्वार्थाने व प्रभावीपणे हाताळणे सुलभ व्हावे म्हणून Web App च्या पायावर मोबाईल अ‍ॅप निर्माण केले असून ते वाचकांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे.
 
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
 
 
 

शेतकरी संघटना मोबाईल ऍपच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ घेता येईल :
 

 • युगात्मा शरद जोशी आणि शेतकरी संघटना
 • शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांशी थेट संपर्क
 • शेतकरी संघटना : शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन व वृत्तांत
 • कृषिजगत : शेतीविषयक ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारभाव, समस्या व समाधान
 • आगामी कार्यक्रम : पुढील कार्यक्रमाची संक्षिप्त तसेच सविस्तर माहिती
 • Vdo : शेतकरी चळवळीशी संबंधित चित्रफ़ित
 • Audio : शेतकरी चळवळीशी संबंधित ध्वनीफ़ित
 • जीवनपरिचय : युगात्मा शरद जोशी यांचा जीवनपट
 • युगात्मा शरद जोशी यांचे लेखन : प्रकाशित पुस्तके, स्तंभलेखन, भाषणे
 • शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य : युगात्मा शरद जोशी यांचेसंबंधातील लेखन
 • वनिताविश्व : महिलाजगताशी निगडीत लेखन
 • शेतकरी संघटक : पाक्षिक शेतकरी संघटक ऑनलाईन वाचण्याची सुविधा
 • व्यासपीठ : विचारविनिमय, मंथन, सविस्तर आणि रचनात्मक चर्चा
 • पारावरच्या गप्पा : चालता-बोलता सामुहिक संवाद
 • गोलमेज चावडी : नुसत्याच गप्पा मारण्यासाठी. विषयाचे बंधन नाही.
 • विचारपूस : विचारपूस, शंकासमाधान, तांत्रिक मदत या संबंधी लेखन
 • व्यक्तीगत निरोप : सदस्यांनी आपसात संवाद साधण्यासाठी

ऍप डाऊनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा.

शेतकरी संघटना मोबाईल ऍपचे फ़ायदे :
 •  शेतकरी संघटना मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करणार नाही.
 • त्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.
 • मोबाईल Hang होणार नाही.
 • व्हाटसप किंवा तत्सम App वर केलेले लेखन फ़क्त गृपमधील सदस्यांनाच उपलब्ध होते. त्यामुळे लेखनाच्या प्रसाराला मर्यादा येतात.
 • शेतकरी संघटना मोबाईल अ‍ॅपवर केलेले लेखन जगाच्या कानाकोपर्‍यात वाचकांना उपलब्ध होईल. 
 • सदर लेखन वेबसाईटवर वाचता येणार असल्याने शेतकरी संघटना मोबाईल अ‍ॅप नसलेल्यांनाही लेखन वाचता येईल.
 • सर्च इंजीनव्दारे शोध घेणारांनाही लेखनाचे दुवे मिळतील.
विशेष सुचना : APP वापरताना तुम्हाला आढळलेल्या तृटी आणि आवश्यक वाटणार्‍या पुरवणी सुविधा यासंबंधी आपल्या सुचना कृपया खालील प्रतिसादात नोंदवाव्यात. मोबाईल अ‍ॅप अपग्रेडेशन करताना आपल्या सुचना आम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरतील.
 
आपल्या सुचनांच्या प्रतिक्षेत!
 
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share