नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

अॅग्रोवनला भेट

Anil Ghanwat's picture

अॅग्रोवनला भेट

अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना, सीमाताई नरोडे यांनी फोन करून, रमेश जाधवांच्या लेखाला दिलेले अध्यक्षांचे उत्तर का नाही छापले अशी विचारणा केली. रविवारच्या अंकात हे सदर चालते व या रवीवारी आम्ही नक्की छापणार आहोत अशी ग्वाही संपादकांनी दिली आहे. पाहू रविवारी छापतात काय.
     काल दुपारी पुणे येथील ऍग्रोवनच्या कार्यालयात सीमाताई , अनिल चव्हाण, शरद गद्रे, लक्ष्मण रांजणे सह ७-८ कार्यकर्त्यांनी, रमेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी भेट दिली. रमेश जाधव तिथे असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले  पण नंतर ते सुटीवर गेले असल्याचे सांगण्यात आले.
      या सर्व टीमने, सहसंपादक श्री. गाडे यांच्याशी चर्चा संघटना, ट्रस्ट, सध्या सुरुअसलेली संघटनेची कामे व जाधवांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांची चर्चा केली. आपले उत्तर छापण्याची हमी तर घेतलीच पण यापुढे महाराष्ट्रात कुठेही, कसलाही कार्यक्रम, आंदोलन झाले तर लगेच कळवत चला आम्ही त्याला "व्यवस्थित कव्हरेज " देऊ असे ही सांगितले आहे. रविवार पर्यंत वाट पाहूया व अॅग्रोवनचे स्टेटमेंट खोडून काढण्यासाठी अंग झाडून कामाला लागू. यापुढे होणारा संघटनेचा प्रत्येक कार्यक्रम उपस्थितीचे रेकॉर्ड मोडणारा आणि तत्वज्ञान व दर्जा उंचवणारा व्हावा या साठी काम करू या. अॅग्रोवनला छापण्या शिवाय पर्याय राहणार नाही असे काम करू या.
 
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना
शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share