नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

मुटे सरांची शाळा : एक कल्पना

Anil Ghanwat's picture

मुटे सरांची शाळा : एक कल्पना

मी भाषांतर करण्याची विनंती केली अन् गंगाधरभाऊंनी ज्ञानार्जनाची एक खिडकी उघडी करून दिली. अनेकांनी भाषांतर करून पाहिले असेल. जमल्याचा आनंद ही घेतला असेल.
हे सर्व पाहता व संघटनेला याची नितांत गरज लक्षात घेता एक कल्पना सुचली आहे. आपल्याला प्रशिक्षित होणे आवश्यक आहे. ठीक ठिकाणी शिबिरे घेणे तसे जिकिरीचे, खर्चिक व फारच कमी व्यक्तींना त्याचा लाभ घेता येतो. दोन दिवस शिकून गेल्या नंतर पुढचे तत्त्वज्ञान मिळविण्यासाठी पुन्हा शिबिर करणे वगैरे आलेच.
मला सुचलेली कल्पना अशी आहे की ज्यांना हे सर्व शिकायचे आहे त्यांनी श्री. गंगाधर मुटे यांच्याकडे नावे व नंबर द्यावेत. एक ग्रुप तयार करावा. रोज रात्री ९ ते ११ एक तासाची वेळ सर्वांनी या प्रशिक्षणासाठी राखून ठेवावी. मुटे सर त्यांच्या पद्धती ने अभ्यास घेतील. सर्वांना प्रशिक्षण सुरू असतानाच प्रात्यक्षिक करावे लागेल.
आपल्या घरी, प्रवासात, परदेशात असले तरी तासाला हजर राहता येईल. खूप शिकण्यासारखे अाहे, मजेशीर आहे अन् सर्वात महत्त्वाचे , फायद्याचे आहे.
 
Ar वेळे संबंधी चर्चा व्हावी.
Ar कोणते विषय प्राधान्याने घ्यावेत या बाबत सूचना याव्यात. अंतिम निर्णय मुटे सरांचा असावा.
Ar असा ग्रुप असावा की नाही यावर चर्चा नको.
Ar नाव नंबर या ग्रुप वरच कळवा
 
मला प्रशिक्षण घ्यायचे आहे.
अनिल घनवट, ९९२३७०७६४६.
वेळ रात्री १० ते ११ सोयीची राहील.
आपली नावे नोंदवा, मुटे सरांच्या शाळेत
 
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना
शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share