नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

शेतकरी संघटना युवा परिषद, आकोट

विलास ताथोद's picture

शेतकरी संघटना युवा परिषद, आकोट

कल्पक कार्यक्रम...आश्वासक सुरुवात!
 
शेतकरी संघटनेला अकोला जिल्ह्यात एखादा युवा मेळावा आयोजीत करायला हवा ही अध्यक्षांची इच्छा होती! त्या इच्छेला युवा परिषदेच्या निमित्ताने मूर्त स्वरूपात आणण्यासाठी महिना दीड महिना झटले ते शेतकरी संघटना प्रवक्ता ललीत बहाळे,युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी व नव्या दमाचे कल्पक युवा नेतृत्व विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष डॉ निलेश पाटील! या तिघांनी प.विदर्भाच्या पाचही जिल्ह्यांत संपर्क दौरा केला.अनेक नव्या दमाच्या युवकांना संघटनेच्या प्रवाहात सामील करून घेतले,डॉ निलेश यांचा मोठा जनसंपर्क,ललित दादांचे प्रभावी उद्बोधन व सतीश दाणींची इच्छाशक्ती अशा त्रिवेणी संगमाच्या  या दौऱ्याने प.विदर्भाच्या संघटनेत जोश निर्माण केला.युवा परिषदेच्या प्रसार,प्रचार साठी सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड,प.विदर्भ शेतकरी संघटना प्रमुख धंनजय मिश्रा,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ जोगळे, विजय भाऊ लोडम,सतीश देशमूख,युवा आघाडी अकोला जिल्हा चे डॉ प्रवीण गायगोळ,दिनेश लोहोकार ,अकोट तालुका प्रफुल्ल बदरखे,अकोट तालुका युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोन्द्रे, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार,दर्यापूर तालुका युवा आघाडी प्रमुख निखिल भायने, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, सिरसोली गावप्रमुख गोपाल गेबड, आदींनी परिश्रम घेऊन ऐतिहासिक युवा परिषद साकार केली.
 

 

 

 

 

 

विदर्भ समाचार
शोधखुणा: 
Share