नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

आंबेठाण : राज्य कार्यकारिणी बैठक रद्द

अधिक माहिती
शेतकरी संघटना राज्य कार्यकारिणी बैठक- आंबेठाण, दि. २८-२९ एप्रिल २०१८ शेतकरी संघटनेची पुढीला कार्यकारिणी जालना जिल्ह्यात घेण्याचे ठरले होते परंतू काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यकारिणिचे ठिकाण बदलण्यात आले आहे. दि. २८ व २९ रोजी अंगारमळा, अंबेठाण, ता. खेड जिल्हा पुणे येथे दोन दिवसाची कार्यकारिणी घेण्याचे ठरले आहे. दि. २८ रोजी सकाळी ११ वा. पासुन दि. २९ रोजी सांय ४ वाजे पर्यंत कार्यकारिणी सुरू राहिल. कार्यकारीणीतील विषय १. १२ डिसेंबर २०१८ रोजी होणार्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशणाची तयारी व विषयवार जवाबदार्या निश्चित केरणे अ. अधिवेशनाच्या प्रचारासाठी जिल्हावार गट तयार करुन प्रचारसभांचे नियोजन करणे. ब. प्रचारसाहित्य- पत्रके, भित्ती पत्रके, बॅनर पोष्टर, भिंती रंगवणे इत्यादी प्रचारा संबंधीच्या जवाबदार्या निश्चित करणे. क. अधिवेशन स्मरणिके संबंधी सर्व जवाबदार्या निश्चित करणे. २. शेतकर्यांच्या प्रश्नांसंबंधी विषयवार आंदोलनाची रणनिती आखणे. विषय व क्षेत्र ठरविणे. उद.: दुध, ऊस, कापुस, नियमन मुक्ती वगैरे. ३. शेतकरी संघटनेतील काही पदांवर नविन नियुक्त्या करणे ४. २०१९ मध्ये होणार्या निवडणुकीसाठी मतदार संघ निश्चित करणे व प्रचार कार्यक्रमाची आखणी. शेतकरी संघटना, महिला आघाडी, युवा आघाडीच्या सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख, सर्व प्रमुख कार्यकर्ते, स्व .भा. प. चे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ज्यांना निवडणुक लढविण्यात रस आहे त्यांनी मतदार संघाची माहिती घेउन उोस्थित रहावे. समर्थकांची फौज घेउन येऊ नये. आंबेठाण येथे जागा, पाणी व इतर व्यवस्थेला मर्यादा आहेत. काही कार्यकर्त्यांनी शक्य असल्यास जवळपास राहण्याची व अंघोळीची सोय करुन घेतल्यास अंबेठाण येथील व्यवस्थेवर जास्त ताण पडणार नाही. कार्यकारिणी अत्यंत महत्वाची असल्यामुळे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन निर्णय प्रक्रियेत भाग घेणे आवश्य आहे. अनिल घनवट अध्यक्ष, शेतकरी संघटना ****** UPDATE दि. २८-२९ एप्रील रोजी आंबेठाण येथे होणारी राज्य कार्यकारिणी रद्द आंबेठाण येथे दि. २८ व २९ एप्रील रोजी होणारी कार्यकारिणीची बैठक सध्या रद्द करुन मे महिण्याच्या दुसर्या आठवड्यात घेण्याचे ठरले आहे. १ मे रोजी विदर्भात होणारे आंदोलन, लग्न तिथी व आंबेठाण येथिल तयारीला पुरेसा वेळ मिळावा या हेतूने ही कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी व इतर कार्यकर्त्यां पर्यंत निरोप पोहोचवावा. अनिल घनवट. अध्यक्ष, शेतकरी संघटना.

Start Date - End Date

Apr 28th, 2018 - Apr 29th, 2018

Start Time - End Time

12:00 am - 12:00 am

Event Location

Cost

श्रेणी

Tags

Organizer

Phone

Email

Share This