नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

ग्रामपंचायतीने करावयाची कामे

ग्रामपंचायतीच्या कामाची यादी :

 • शेतजमीन सुधारणा,
 • छोटे पाटबंधारे,
 • पाण्याचे नियोजन व पाणलोट क्षेत्र विकास,
 • दूध उत्पादन- पशुसंवर्धन,
 • कुक्कुटपालन.
 • मत्स्य व्यवसाय,
 • सामाजिक वनीकरण,
 • वनशेती व वनसंपत्ती उत्पादन,
 • लघुउद्योग, कुटिरोद्योग, खादी ग्रामोद्योग,
 • घरे,
 • पिण्याचे पाणी,
 • जळण आणि चारा,
 • दळणवळणाची साधने, रस्ते, पूल, फेरीबोट, जलमार्ग इ.
 • विद्युतीकरण,
 • दारिद्रय निर्मूलन,
 • प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, प्रौढशिक्षण व अनौपचारिक शिक्षण, तंत्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन,
 • ग्रंथालय,
 • आरोग्य व स्वच्छता- ग्रामीण आरोग्य केंद्र, दवाखाना व रुग्णालय, कुटुंबकल्याण,
 • महिला व बालकल्याण,
 • समाज संपत्तीचे संरक्षण,
 • आर्थिक-सांस्कृतिक कल्याण,
 • अनुसूचित जाती-जमातीसाठी कामे,
 • अपंग व मतिमंदाकडे विशेष लक्ष पुरवणे,
 • सार्वजनिक वितरण व्यवस्था,
 • बाजार आणि जत्रांची कामे इ.

       ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ अन्वये पंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये निश्चित करून दिलेली आहेत. या कलमाच्या अनुषंगाने ग्रामसूची किंवा अनुसूची- १ मध्ये वेगवेगळ्या १२ विभागांच्या संबंधी ७८ विषयांची जबाबदारी ग्रामपंचायातीकडे सोपविण्यात आली आहे. अनुसूची १ मध्ये नमूद केलेले विभाग आणि त्याअंतर्गत विषयांची संख्या याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :

ग्रामसूची किंवा अनुसूची

 1. कृषि
 2. पशुसंवर्धन
 3. वने
 4. समाजकल्याण
 5. शिक्षण
 6. वैद्यकीय आणि आरोग्य
 7. इमारती व दळणवळण
 8. पाटबंधारे
 9. उद्योगधंदे व कुटीर उदयोग
 10. सहकार
 11. स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण
 12. सामान्य प्रशासन
 
Share