नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

योजनेच्या प्रमुख अटी :

गट (अ) :-
६५ व ६५ वर्षा वरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना गट (अ) मधून रु.४००/- प्रतिमहिना निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे रु.२००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्यशासना कडून रु.४००/- प्रतिमहा व केंद्रशासना कडून रु.२००/- प्रतिमहा असे एकूण रु.६००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.

गट (ब):-
या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१,०००/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये ६००/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
Share