नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना

योजनेचा उद्देश्य -
 
शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत - त्यात संजय गांधी निराधार योजना ही एक आहे. राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.
 
पात्रतेचे निकष, अटी आणि शर्ती
 
  • निराधार, वृद्ध व्यक्ती,  अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटित महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या
  • किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
  • वय - ६५ वर्षांपेक्षा कमी
  • कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत

लाभाचे स्वरूप
 
  • लाभार्थ्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात
  • एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे
 
  • वयाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
  • अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन)/ सरकारी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांचा दाखला
 
Share