नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गझल: देहदान करूनही

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

देहदान करूनही, अंत्ययात्रा; माग लावता
आक्टं घेऊन काय, दवाखाण्यात; आग लावता ?

उमगत नाही मला, कविते तुला, कवेत न घेता
तिमिर ऊरी दाटला गे ! रात्री चिराग लावता

माणूस आहे, यांच्यासारखा, त्यांच्यासारखा
कोण आहे, कोण नाही, कसला दिमाग लावता

राजकारण म्हणजे, नेत्यांची एक; गुन्हेगारी
तिही लोकांचा, लोकांविरुद्ध; सहभाग लावता

धुंदीत मला हा, मस्त अपुल्या; सुगंध दरवळतो
निघून जावो, जन्म असाची; फूल-बाग लावता

सोपा अति हा, मार्ग आहे; किंवदंती होण्याचा
काहीही करावे, मुर्दाडांना; जाग लावता

शेतकऱ्यांच्या बाजुने, फक्त; शेतकरी लढतील
निश्चिती झाली, असता कशास; अनुराग लावता

Share