नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

गझल: बाशिंदा (मुलनिवासी)

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

शेतकरी आहे म्हणून, ही दुनियां जिंदा आहे
तो फक्त पोशिंदा नाय, अव् तो बाशिंदा आहे

तुझ्या अस्तित्वावर प्रश्न! मुर्ख आहेत महामुर्ख
तुझ्याशिवाय कोण येथे, रे; अत्यानंदा आहे

डॉक्टराने डबा दिला, बाळंतिनीला दुधाचा
पैसा नसे औषधाला, बापय शरमिंदा आहे

एक ताई होती मला, ती नाही आहे आता
खूप छान असे; तीचे नं, नाव मित्रविंदा आहे

मुद्दल परत करून टाक, ती माझी आहे; माझी
वाटल्यास व्याज खा नं तू, मला व्याज- निंदा आहे

Share