नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गजल: धर्माच्या भिंती

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गजल

धर्माच्या भिंती, उभारतील लोकं
धर्माच्या भिंती, झुगारतील लोकं

खोटी आश्वासनं, कितीक ऐकणार
थांबा तुम्हाला, लगावतील लोकं

झाला गेला इति, न राहणार हास
देशा भूमिति, सुधारतील लोकं

शांती क्रांती हो, नवीन काय त्यात
काही का झाले, सवारतील लोकं

मायेचा राहो, असा तसाच हात
प्रेमाला त्याची, पुकारतील लोकं

Share