नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

अद्ययावत जनतंत्र

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

संविधान देशाचे, लोकांचे लोकतंत्र
आरक्षण सामाजिक, न्याय समतेचा मंत्र

साऱ्या जगात आता, स्वीकार होत आहे
डॉ. आंबेडकर प्रणित, अद्ययावत जनतंत्र

गाडला बुद्ध ज्यांनी, आता ते पिसाळले
आणु पाहत आहेत, पून्हा ते धर्म-तंत्र

रोटीहून अनिवार्य, माणसिक उन्नतीला
शिक्षण आहे आणिक, हे बंधुता स्वातंत्र

शेतकरी कामकरी, आदिवासी तयांना
आजही छळत आहे, मनुवादी अहंतंत्र

कुठेतरी हृदय हवे, प्रजातंत्राच्या उरी
बाबासाहेब फुले, शाहु यांचा मुल-मंत्र

जेमतेम सूर्योदय, होतो आहे आता
येईल याही पुढे, जरा थांबा गुणतंत्र

Share