नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

गझल: या भुकेला आज खाऊ

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

शपथ केल्या चाकरीची, भूक नाही भाकरीची
या भुकेला आज खाऊ, चूक नाही भाकरीची

लोक रीती पाळताना, जाण ठेवत असत नाही
निपजते मग भाडखाऊ, चूक नाही भाकरीची

मीडियाची चित्रवाणी, ती तं आहे लय अगाऊ
खबर त्यांची ही बिकाऊ, चूक नाही भाकरीची

शेत्करी हे शासनाला, जाब आता पुसत आहे
हक्क त्यांचा मान भाऊ, चूक नाही भाकरीची

बोलबाला इंग्रजीचा, काळ तीचा वेळ तीचा
मायबोली दे न जाऊ, चूक नाही भाकरीची

Share