नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

गझल: उडवली हुक

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

श्रेष्ठत्व मिरवले येथे उडवली हुकं
भाकरीचे तत्वज्ञान नाही अचूकं

ढोरा डुकरा प्रमाणे अनुकरण केले
भाकरीची यात नाही काहिही चूकं

प्रकाश पाहण्यासाठी अंधार केला
झाले ऐसे की माणूसच बधिर मूकं

बिमारी ही पसरली सर्वत्र अशी की
औषधांच्या बाजारात ही पसरलं धुकं

शेत्करी मागु लागले, घामाचे दाम
त्यांनी तरी का म्हणून राहावे भूकं

Share