नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

गझल: तीलाही पिल्ले झाले

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

हॉटेलांत तब्दील येथे किल्ले झाले
छक्के पंजे बरेच काही ढीले झाले

निळ्याची भाषा सर्व रंग बोलू लागले
बाकीचे ही काही आता ओले झाले

लोकशाहीच्या दंगलीत साऱ्यांचेचं हितं
सव्वाशे करोड तीलाही पिल्ले झाले

शेत्कऱ्यांच्या मागणीचा मुंबईत मोर्चा
शेतकऱ्यांना गरीब सरकार भिले झाले

शेतीचे निदान कोणी का केले नाही
हातात त्यांच्या थोडे फार दिले झाले

Share