नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

गझल: शेत्कऱ्यांचा शत्रू

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

माझ्या घराला आहे, माझ्या घराचे दारं
शेत्कऱ्यांचा शत्रू कोण? शिवाय त्याचे पोरं !

एकीचं बळ कुचकामाचं, माणूस नाय ढोरं
शेळ्यांच्या कळपाला, म्हणती का कोणी थोरं

मी जे जानतो तेच, अज्ञान आहे माझे
सकाळच्या राम प्रहरी मज, पडलं सपान कोरं

संपत्ती आहे तेथे, शेत आहे जेथे
पण देव धर्माच्या नादाने झालयं ढोबरं

देश नावाने हे माझे, शेत लूटलेले
भेस बदलून चोरं आले, म्हणतात सरकारं !

Share